गावाची स्मशान भूमीची जागा खुली करून दयावी तसेच सन १९७५ पासून गावात शासनाने राबविलेल्या मात्र सध्या त्यावर इतरांची मालकी असलेल्या योजना गावकऱ्यांच्या ताब्यात मिळाव्या अशा विविध मागण्यांसाठी विजयवाडी ग्रामस्थानी येथील प्रांत कार्यालयासमोर चक्रीउपोषण सुरु केले आहे.शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी या आंदोलन कर्त्यांना भेट देऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या.
या विजयवाडी गावाचे सरपंच शालन वाघमोडे व ,सदस्य व ग्रामस्थांनी सह्या केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, या मागण्यांसाठी सर्व ग्रामस्थांचे वतीने ग्रामपंचायत प्रयत्न करीत असून १७ मार्च २०१७ पासून मंत्रालयातील महसूल विभागाकडे पाठपुरावा करीत आहे.मात्र त्यास संबंधितांकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही. या गावाची पूर्वीची असणारी स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी महसुली अधिकाऱ्यांना हाताशी धरून तशी त्या क्षेत्रास असणारी नोंद रद्द करून घेतली.याशिवाय या गावात सन १९७५ पासून ज्या काही शासकीय योजना गावकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या मात्र त्यावर सध्या काही लोकानी ताबा मिळवला आहे,तो खुला करून त्या योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्याव्यात अशा अनेक मागण्यांसाठी ग्रामपंचायत अनेक दिवसापासून प्रयत्न करीत आहे मात्र त्यास यश येत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालणार असून दररोज काही ग्रामस्थ या उपोषणाला बसणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.दुपारी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख यांनी येऊन या आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन आपण त्यांचे बरोबर असल्याचे सांगितले. तसेच अनेक सामाजिक संघटनांनी भेटून या आंदोलनाला पाठींबा दिला. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विजयवाडी गावातून शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित झाले होते.

Category
🗞
News