अशोक पत्की यांचे एकापेक्षा एक स्वराविष्कार | Ashok Patki

  • 5 years ago
एकापेक्षा एक १२ कलाकारांचे स्वराविष्कार! शैलजा कानडे, संजय चव्हाण ‘पहिल्या सुर-ताल’ स्पर्धेचे विजेते!

रवींद्र नाट्य मंदिरातील मिनी थिएटर मध्ये नुकतीच अंत्यंत आगळीवेगळी 'सुर-ताल कराओके क्लब' प्रस्तुत 'सुर-ताल ऍमॅचोर मास्टर २०१९' ‘पहिली कराओके ट्रॅक गायन स्पर्धा’ पार पडली. जेष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की हे या स्पर्धेला मार्गदर्शक होते तर संगीत विशारद नानू गुर्जर, प्रसिद्ध गायक यशवंत कुलकर्णी आणि रसिकांचे प्रतिनिधी म्हणून आनंद देवधर परीक्षक होते. 'सनई चौघडे', 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास' या चित्रपटांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक रमाकांत पांडे आणि हिंदी - मराठी चित्रपटांचे संगीतकार सतीशचंद्र मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

प्रत्येक व्यक्तीत कोणते न कोणते सुप्त कलागुण असतातच. पण परिस्थितीमुळे प्रत्येकालाच ते जोपासता येतातच असे नाही. मात्र त्यालाही काही अपवाद असतातच. सर्वसामान्य माणसांतील हेच कलागुण हेरून 'सुर-ताल कराओके क्लब'ने 'सुर-ताल ऍमॅचोर मास्टर २०१९' ही स्पर्धा जाहीर करताच या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत गेला. या स्पर्धेत पहिल्या फेरीत १४१ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. पहिल्या आणि दुसर्‍या फेरीतून अंतिम फेरीसाठी १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत सहभागी झालेल्या १२ स्पर्धकांनी एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करून ही स्पर्धा परीक्षकांसाठी अधिकच अवघड करून ठेवली होती. पहिल्या राऊंडमध्ये स्पर्धकांनी आपल्या पसंतीचे गाणे सादर केले तर दुसऱ्या राऊंडला त्यांच्या आवडीच्या तीन गाण्यांपैकी परीक्षकांना आवडलेले एक गाणे गायले. या परीक्षकांनी निवडून दिलेली सर्व गाणी प्रत्येक स्पर्धकाने कमालीची समरसून गायल्याने ही फेरी अधिकाधिक रंगत गेली.

या स्पर्धेचे अचूक परीक्षण लोकप्रिय जेष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की यांनी पाहिले. त्यांच्यासोबत संगीत विशारद नानू गुर्जर यांचे बहुमूल्य योगदान लाभले होते. तसेच पहिल्या फेरीपासून अंतिमफेरीपर्यंत स्पर्धकांना मार्गदर्शन प्रसिद्ध गायक यशवंत कुलकर्णी आणि रसिकांचे प्रतिनिधी म्हणून आनंद देवधर यांनी पारदर्शकपणे केले. ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिकच रंगात गेली. पूर्ण तयारीने स्पर्धक या स्पर्धेत उतरल्याने कमालीची चुरस निर्माण झाली. संपूर्ण स्पर्धेत परीक्षकांनी अत्यंत पारदर्शक निर्णय घेतला. अंतिम फेरीत परीक्षकांनी आयोजकांना 'परीक्षकांच्या पसंतीचे विशेष पारितोषिक' वाढविण्याची शिफारस केली. 'परीक्षकांच्या पसंतीचे विशेष पारितोषिक' संदीप गोगटे यांना देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक संपदा कुलकर्णी आणि उमेश कांबळे यांना दिले गेले. स्मिता राव व समीर जोशी उपविजेते ठरले. सौ. शैलजा कानडे आणि श्री. संजय चव्हाण हे अंतिम स्पर्धेचे प्रथम पुरस्कार विजेते ठरले.

सुर-ताल परिवाराचे हिस्सा असलेले महेश कालेकर यांसोबत अनेक पडद्यामागील कलावंतांनी हा कार्यक्रम रंजक व दर्जेदार होण्यासाठी हातभार लावला होता. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अश्विन बापट यांनी केले. त्यांनी जेष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की यांची रंगतदार मुलाखत घेत पत्कींना भूतकाळात घेऊन जात त्यांचा जीवनप्रवास रसिकांना उलगडून दाखविला. तर परीक्षक गायक नानू गुर्जर, यशवंत कुलकर्णी यांनी एक एक गाणे गायले.

तुम्हाला आमचे विडिओ आवडले असतील तर सपोर्ट करा आणि Likeकरा ,
Share करा आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका धन्यवाद .
जय जिजाऊ, जय शिवराय
#cinemarathi #ashokpatki

Recommended