• 5 years ago
बुलडाणा येथील एका अनाथ मुलीचे लग्न सर्वांनी एकत्रित येऊन लावून दिले आहे वर्धासह अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात दिव्य मराठीने विशेष मोहिम राबवली आहे यामध्ये नागरिक सहभागी होउन शपथ घेत आहेत 'आता एकही फुलराणी जळणार नाही' या आशयाची ही शपथ बुलडाणाच्या या नववधूने सुद्धा घेतली सोबतच, लग्नात सुद्धा सर्व पाहुणे मंडळीच्या साक्षीने ही शपथ घेणार आहे

प्रेमाच्या अडीच अक्षरांची गोष्ट अवघं जग बदलून टाकते पण, प्रेमाला बदनाम करणाऱ्या नराधमांनी विकृत पुरुषी आकर्षणाला प्रेम मानलं नकार देणाऱ्या मुलींच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली नराधमांना केवळ फासावर देऊन हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी गरज आहे, मानसिकता बदलण्याची त्या दिशेने आपण स्वतःही पुढं येण्याची आधी आपण आपला चेहरा बदलू म्हणून, आजपासून ‘व्हॅलेंटाइन डे’पर्यंत हाच असेल आपला डीपी सर्व समाजमाध्यमांवर मानसिकता बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करू हा डीपी दिव्य मराठीच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे तिथून तो डाऊनलोड करून घेता येईल

Category

😹
Fun

Recommended