कोरोनाकाळात हरवलेली प्रसन्नता मिळविण्यासाठी दिल्या टिप्स | Coronavirus | School Tips

  • 3 years ago

कोल्हापूर : कोरोना लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होवून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मुलं घरात बंदीस्त झाली. नियमाच्या चौकटीत मुलं कंटाळली, हिरमुसली. कोणी रागविली तर कोणी आजारी पडली. कोरोनाकाळात बालकांची हरवलेली प्रसन्नता आणि उत्साह पुन्हा मिळविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मुलांचे भावविश्‍व समजून घेणे, त्यांना धीर देणे, त्यांचे छंद जोपासन्यापासून ते संतुलीत आहार, सुर्यनमस्कार, प्राणायमपर्यंतची आवड त्यांना लावणे आवश्‍यक आहे. त्यातूनच बालकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरूस्त बनवता येईल, असा सूर "सकाळ'च्या "सिटीझन एडीटर' या उपक्रमात व्यक्त झाला. बालशिक्षण तज्ञ, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञांचा यात सहभाग होता. शाळा महत्वाची आहेच पण त्याचबरोबर सुजाण पालकत्वावरही भर दिला पाहिजे, अशी मतेही मान्यवरांनी मांडली.

(बातमीदार - शिवाजी यादव)
(व्हिडीओ - बी डी चेचर)

Recommended