मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात '८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी.' या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. कात्रज परिसरात चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी शुटिंग शुभारंभ करत अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या एका दृश्याची क्लॅप दिली. हे चुंबनाचे दृश्य असल्यानं राज ठाकरे थोडेसे लाजले देखील होते. ही चर्चा रंगलेली असताना यासोबतच या कार्यक्रमाला भाजप ओबीसी सेल आणि माजी आमदार योगेश टिळेकर हेही उपस्थित असल्यानं राजकीय चर्चांना देखील उधाण आलं होतं
Category
🗞
News