पिंपरी- चिंचवडकरांनो घाबरू नका, ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल Politics | Sarakarnama

  • 3 years ago
पिंपरी:पिंपरी चिंचवड शहरातील ऑक्सिजन पुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत होणार असल्याने काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज केले. इतर जिल्ह्यातून ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील ऑक्सिजन टंचाई दुर करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात येईल,असे ते म्हणाले. पालिकेच्या पदाधिकार्यांनी याप्रश्नी त्यांची भेट घेतली. महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती अध्यक्ष अँड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार हिंगे यांनी राव यांची त्यांच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी ऑक्सिजन तुटवडा प्रश्नावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

#sarkarnama #pune #covidcases

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended