• 4 years ago
Tarun Tejpal: लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल याच्याविरुद्ध आज म्हापसा येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाने आजही या प्रकरणाचा अंतिम निकाल पुढील बुधवारपर्यंत (ता.19) तहकूब केला आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्रकरणाचा निकाल 19 मे पर्यंत राखून ठेवण्यात आल्याचे न्यायाधीश शमा जोशी यांनी स्पष्ट केले आहे.सुमारे सात वर्षांपूर्वी २०१३ मध्ये गोव्यातील बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’मध्ये तरुण तेजपाल याच्या महिला सहकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती. तेव्हा या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आजही अनेक जणांना या प्रकरणाची माहिती नाही.
नक्की काय आहे तरुण तेजपाल प्रकरण? आपण जाणून घेऊयात
#gomantak #taruntejpal

Category

🗞
News

Recommended