Ajuni Barsat Ahe Team Fun | टीम ‘अजूनही बरसात आहे’ची ऑफस्क्रिन धमाल | Lokmat Filmy

  • 3 years ago
नाटक, सिनेमा आणि मालिका या माध्यमांतून अभिनेत्री मुक्ता वर्बे हिनं प्रेक्षकांच्या मनावर आपली विशेष छाप सोडली आहे. तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर कायमचं नाव कोरणारी असते. विनोदी आणि गंभीर अशा अतिशय वेगळ्या भूमिका मुक्ता साकारताना दिसून येत असते. आता मुक्ता सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून मीरा ही भूमिका साकारत प्रेक्षकांसमोर येते. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळतयं. मुक्ता ऑनस्क्रीन आपलं काम अगदी चोखपणे करताना दिसून येते पण ऑफस्क्रिन मात्र ती सेटवर खूपच धमाल मस्ती करताना दिसून येते. नुकतचं मुक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतील आदिराज, मल्हार आणि मनु म्हणजेच अभिनेता उमेश कामत, संकेत कोरलेकर आणि अभिनेत्री पूर्वा फडके यांच्यासोबत ऑफस्क्रीन धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये मुक्ता, उमेश, पूर्वा आणि संकेत हे चौघही गाडीत बसलेले दिसून येतायेत
snehalvo
#AjuniBarsatAhe #Umeshkamat #Muktabarve #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber