डोंबिवलीतील खड्डय़ांमुळे गॅस सिलिंडर पडले रस्त्यावर

  • 3 years ago
डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील पडलेले खड्डे हे मोठय़ा अपघाताला आमंत्रम देणारे ठरत आहे. डोंबिवलीतील एक गॅस एजेन्सीचा टेम्पो गॅस सिलिंडर भरलेले नेत असताना तो खडय़ात आदळला. त्यातील गॅस सिलिंडर रस्त्यावर पडले. त्यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. अपघात घडला नसला तरी गॅस सिलिंडर वाहक व कामगाराने या अपघाताला रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याचे विधान केले.