२५ फुटाच्या अजगराचा शिकार करून त्याला तळून खाल्ले इंडोनेशिया मध्ये | मराठी न्यूज

  • 3 years ago
हॉलिवूडच्या 'अनाकोंडा' पट पाहताना अनेकांचे धाबे धडाडले होते. या अजस्त्र सापाचे दर्शननाने आणि त्याच्या रुद्र अवताराने मनात भीतीचे काहूर कायम ठेवले होते. यानंतर अशा सापाला खाणं सोडाच, कल्पना ही अंगावर शहारे आणते!
सापांनी लोकांना खाल्लेल्या घटना तुम्ही चाखत चाखत वाचल्या असतील पण इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावरील बतांग गनसाल जिल्ह्यातील लोकांनी अक्षरशः सापावरच ताव मारला. हा अजगर प्रचंड मोठा होता, महाकाय अजस्त्र होता ! या अजगराची लांबी २५ फूट इतकी होती. या गावात राहणारे रॉबर्ट नाबाबन ह्यांनी घरी जाताना, हा भाला मोठा अजगर पहिला आणि मग, गावकर्यांच्या साथीने ह्याची शिकार केली. गावकऱ्यानी या सापाला तळून खाण्याचा बेत आखण्यापूर्वी ह्या महाकाय सापाला प्रदर्शना करता ठेवण्यात आलं होत. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी पामच्या झाडाला बांधून ठेवले होते. सध्या येथे पामच्या लागवडी चा हंगाम सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट असतो. त्याच्या शिकारीस हा अजगर आला आणि स्वतःच शिकार झाला.

शिकारीही शिकार होतो ह्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे..

Recommended