अभिनेता राम कपूर यांच्या वागण्यात हल्ली राम राहिला नाही |

  • 3 years ago
अभिनेता राम कपूर यांच्या वागण्यात हल्ली राम राहिला नाही.

अभिनेता राम कपूर विरोधात सत्र न्यायालयामध्ये फसवणूकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. कुलाब्यातील बेस्ड मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी नावाच्या कंपनीकडून ३५ लाख रूपये कर्जाच्या स्वरूपात घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र ते पैसे परत न केल्यामुळे राम कपूरच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मावी एलएलपीने राम कपूरच्या विरोधात २१ जून २०१७ ला कुलाबा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये फसवणुकीचा आरोप केला आहे. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी पैशाची गरज असल्याचं सांगून पैसे घेतल्याचा कंपनीने आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या प्राथमिक तपासणीनंतर कुलाबा पोलिसांनी मावी एलएलपीला हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा सल्ला दिला. मावी बिझनेस वेंचर्सचे वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वर्षीच्या मे महिन्यामध्ये लिंक लीगल इंडिया लॉ सर्व्हिसेसने कपूरला एक कायदेशीर नोटीस पाठवून त्याला कर्जाची परतफेड करण्यास सांगितले. या नोटीसमध्ये ऑगस्ट २०१६ कर्जाचे पैसे घेतल्यानंतर ते कपूरला ते एका महिन्याच्या आत २४ टक्के व्याजाने परत करायचे होते.

Recommended