चायनाला धडा शिकवण्यासाठी भारत करणार हे । जाणून घ्या | India China News Update

  • 3 years ago
चायनाला धडा शिकवण्यासाठी भारत करणार हे । जाणून घ्या

डोकलाम प्रश्नावरून सतत कुरापती काढणाऱ्या चीनला अमेरिकेने चांगलीच चपराक दिली आहे. भारताबरोबरचे अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत करण्यावर भर देण्यासोबत, चीन आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम तोडत असल्याची तक्रार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी केली आहे.

पुढच्या आठवड्यात टिलरसन भारत आणि पाकिस्‍तानचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यापूर्वी भारत आणि अमेरिकेच्या संबंधाबाबत टिलरसन बोलत होते. ते म्‍हणाले,‘‘अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत एकमत आहे. याचा फायदा फक्‍त भारत आणि अमेरिकेलाच होणार नाही. तर, शांतताप्रिय असणाऱ्या सर्वच देशांना होणार आहे.

टिलरसन म्‍हणाले, ‘‘पाकिस्तानने आपल्या देशात असलेल्या दहशतवादी गटांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्‍यामळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची स्थिती सुधारून त्या देशात शांतता प्रस्थापित होईल. तसेच भारताच्या तुलनेत चीनने आपल्या जबाबदाऱ्या म्हणाव्या तशा उचलल्या नाहीत. चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. भारताने मात्र, काद्यांतर्गत राहून दुसऱ्या देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला आहे.’’

आशिया खंडात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र येवू शकतात असे संकेत टिलरसन यांनी यावेळी दिले.

Recommended