फडणवीसांची पेट्रोल विषयी विस्फोटक आइडिया | CM Latest News | Political News

  • 3 years ago
पेट्रोल आणि डीझेल च्या वाढलेल्या किमतींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकार ने एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी तर राज्यसरकारने पेट्रोल वर 2 रुपये तर डीझेल वर 1 रुपया कर कमी केला. पेट्रोल, डीझेल जी.एस.टी. मध्ये आणलं तर दर 43 रुपयांपर्यंत खाली येतील अशी फडणविसांनी नवी कल्पना दिली. आकडेवारीनुसार सरकार 26.65 रुपयांना पेट्रोल खरेदी करते त्यावर डीलरला विक्री 30.13 रुपयांना ,डीलरचे कमिशन 3.24 रुपये, केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी 19.48 रुपये तर राज्य सरकार तब्बल 47.64 टक्के कर लावते ज्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पेट्रोल 76.18 रुपयांना मिळते, तर डिझेलचा खर्च 23.86 रुपये डीलरला विक्री 27.63 रुपयांना व त्याचे कमिशन 1.65 रुपये .सगळे कर मिळून 60 रुपयांच्या पुढे जाते. आणि जर जी.एस.टी. 28% लावला तर अनुक्रमे पेट्रोल चा दर 43 रुपये तर डीझेलचा दर 41 रुपये होईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended