आणि त्याने मुख्यमंत्रीना फेकून मारली बाटली | Devendra Fadnavis Latest News | Lokmat News

  • 3 years ago
वाढती बेरोजगारीचा प्रश्न भीषण होत चालेला आहे. पण 'मेकीन इंडिया'च्या प्रकल्पामुळे फारसे चित्र बदलले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राळेगणसिद्धी येथील सभेत एका मूक-बधीर तरुणाने त्यांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. प्रशांत महादेव कानडे असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नगर तालुक्यातील मेहकरीचा रहिवासी असलेला प्रशांत कानडे दिव्यांग आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला रोजगार हवाय. त्याने बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, पण मूक-बधीर असल्याने त्याला कुणीच नोकरी दिली नाही. शेवटी, बँकेत शिपायाची किंवा तत्सम नोकरी मिळावी, यासाठी त्यानं जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री सचिवालयाला पत्र दिलं होतं. परंतु, दहा महिन्यांनंतरही त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रशांतच्या रागाचा आज उद्रेक झाला. आता तरी त्याची नोकरीची प्रतीक्षा संपते, की 'बाटलीफेकी'बद्दल शिक्षाच होते, हे पाहावं लागेल.दिव्यांग व्यक्तींना सामान संधीची गरज असते, सहानुभूतीची नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended