• 4 years ago
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बहुचर्चित “दशक्रिया” हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड मल्टीप्लेक्स ने घेतला आहे. या निर्णय नंतर या चित्रपटासाठीचे ‘बुक माय शो’ आणि इतर ऑन लाईन बुकिंग झालेले नाही. सिटी प्राईड कोथरूड कडून ऑन लाईन बुकिंग बंद करण्यात आले आहे. दशक्रिया चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुण्यातील अनेक थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स भेटी देत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची काल विनंती केली होती. त्यानंतर सिटी प्राईड कोथरूड मल्टीप्लेक्सने चित्रपट प्रदर्शित न करण्याची काल विनंती केली होती. त्यानंतर सिटी प्राईड कोथरूड ने हा चित्रपट दाखवणार नसल्याचे जाहीर केले. इतर अनेक थिएटर्स आपल्या विनंतीचा विचार करून हा चित्रपट प्रदर्शित करणार नाही अशी आशा ब्राह्मण महासंघाला आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended