• 3 years ago
हॉटेलांमधील खाद्यपदार्थावर सरसकट पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय झाला असला तरी हॉटेलच्या बिलात कोणताही फरक पडलेला नाही. जीएसटी घटूनही लाभ न देणाऱ्या मॅडोनाल्ड विरोधात एका ग्राहकाने तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हॉटेलांमधील खाद्यपदार्थावर आकारण्यात येणारा जीएसटी 18 वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला. त्यानुसार 15 नोव्हेंबरपासून सुधारित दरपत्रक लागू करण्यात आले आहे. मात्र, हॉटेलच्या बिलात कोणताही फरक पडलेला नाही. याबाबत अनेक ग्राहकांनी सोशल मिडियावरून तक्रारी केल्या आहेत. जीएसटी घट झाली असली तरी त्याचा लाभ न मिळाल्याने एका ग्राहकाने ट्विटवरून मॅडोनाल्ड विरोधात तक्रार केली आहे. त्यासोबत जुने आणि नवीन बिलही शेअर करून जीएसटी कमी झाला असला तरी मॅडोनाल्ड ने पदार्थाची किंमत वाढवली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जीएसटीचे दर घटूनही त्याचा लाभ न दिल्यामुळे त्याने निषेधही केला आहे. तसेच मॅडोनाल्ड विरोधात कारवाई करावी, अशी मागणी अर्थमंत्रालयाकडे केली आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended