देशी दारूची दुकाने आणि बिअर बारला महापुरुषांचे नाव देता येणार नाही | Liquor Latest News

  • 3 years ago
राज्यातील देशी दारूची दुकाने आणि बिअर बारला महापुरुष आणि देवी देवतांची नाव देता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार एक अधिसूचना जारी करणार आहे. दरम्यान राज्यातील उत्पादन शुल्क विभागालाही याबाबत परिपत्रक जारी करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.राज्यातील दारूचे दुकान व बिअर बारला महापुरुषांचे नाव देण्यात येत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत मांडला होता. हा महापुरुषांचा अवमान असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभत नाही, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर पंडित यांच्या सूचनांची दखल घेत उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग व उत्पादन शुल्क खात्यातील अधिकाऱ्यांशी याबदद्ल चर्चा केली. त्यानंतर कामगार मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमण्यात आली. गेल्या आठवड्यात या समितीच्या बैठकीत देशी दारूची दुकाने, बिअर बार व परमिट रूमला महापुरुष, देवी देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच यासाठी कामगार कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews