वॉशिंगटन सुंदर नावामागची कहाणी.| Lokmat News

  • 3 years ago
मोहाली येथे भारताचा दुसरा क्रिकेट सामना श्रीलंकेविरुद्ध झाला, ह्या सामन्यात आपण रो हिट वादळ अनुभवले. आणि त्याने पूर्ण सामना षटकारमय करून टाकला होता. मात्र हा सामना भारताच्या इतर नवोदित खेळाडूंसाठी सुद्धा महत्वाचा होता. ते म्हणजे श्रेयस अय्यर आणि वॉशिंगटन सुंदर. 18 व्या वर्षी भारतीय संघाची निळी टोपी मिळवणारा वॉशिंगटन सुंदर हा सातवा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या नावाबद्दल अनेकांच्या मनात कुतुहूल आणि प्रश्न आहेत? त्याचे नाव वॉशिंगटन का बरे ठेवण्यात आले? त्याच्या वडिलांनी ह्याचे उत्तर दिले ते म्हणाले कि आमच्या घरापासून दोन गल्ल्या सोडून सैन्यातून निवृत्त झालेले पी.डी. वॉशिंगटन हे गृहस्थ राहत होते. ते माझ्यासाठी देवापेक्षा कमी नव्हते. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. म्हणून त्यांची स्मुती म्हणून मी माझ्या मुलाचे वॉशिंगटन ठेवले आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended