सरकार कडून मिळालेल्या मदतीचा चेक ३ वेळा बाऊन्स | वरून बँकांचा भुर्दंड | Lokmat News

  • 3 years ago
यवतमाळच्या गौतमनगरात राहणाऱ्या सपना इंगळे या महिलेचे पती दीपक इंगळे यांचा 14 मार्च 2017 रोजी विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांचा धनादेश मिळाला. तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा हा धनादेश घेऊन सपना इंगळे तीन वेळा स्टेट बँकेत गेल्या. मात्र तिन्ही वेळा चेक बाऊन्स झाला.धनादेशही बाऊन्स होतो, हे पाहून गरीब लाभार्थी महिला संभ्रमात पडली आहे . त्यावरही बँकेने चेक देणाऱ्याऐवजी लाभार्थ्यावरच दंड आकारला. या संदर्भात यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना विचारणा केली असता याबाबत तपास आणि चौकशी करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.
लोकांच्या घरी घरकाम करून सपना आता दोन मुलं आणि सासऱ्यांचा सांभाळ करतात. मात्र या सरकारकडून मिळालेल्या मदतीसाठी मात्र त्यांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended