18 जानेवारीला मुंबईत होणार ठणठणाट|मुंबईकर व्यवस्था करून ठेवा | Lokmat News

  • 3 years ago
मुंबई महापालिकेतर्फे माहीम भूमिगत बोगद्याजवळ १२०० मिमी व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचे काम १८ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मरोळ-मरोशी पासून रुपारेल कॉलेज ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा १२ तासांसाठी बंद करावा लागणार आहे. परिणामी कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, दादर, परळ, वांद्रे या भागात या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही.मुंबई शहरात ब्रिटिशकालीन जलवाहिन्या आहेत. या जीर्ण वाहिन्यांतून दररोज ७०० दशलक्ष लिटर पाण्याची गळती होते. पालिकेने या जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम ठिकठिकाणी हाती घेतले आहे. त्यातील ही झडपेची दुरुस्ती महत्त्वाचा भाग आहे. या दुरुस्तीमुळे शहर भागातील गळतीला मोठ्या प्रमाणात अटकाव निर्माण होईल, असा पालिकेला विश्वास आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended