बलात्कारानंतर कुणी I love you म्हणेल का? न्यायालयाचा रोकडा सवाल | Lokmat Marathi News Update

  • 3 years ago
बलात्काराच्या आरोपा प्रकरणी फारुकी यांना सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाचा तो निर्णय फिरवत फारुकी यांना निर्दोष मुक्त केलं. त्या निर्णयाला पीडित महिलेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आधीपासूनच रिलेशनशीप मध्ये असलेल्या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर निर्णय देणं मोठं कठीण काम होतं. तरीही या प्रकरणात चांगला निर्णय दिला गेला असून यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, अशा शब्दांत खडंपीठानं उच्च न्यायालयाचं कौतुक केलं.या प्रकरणात आरोपीला सत्र न्यायालयानं ७ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे,' याकडं पीडित महिलेच्या वकिलांनी लक्ष वेधले. त्यावर, 'तुम्ही ज्येष्ठ वकील आहात आणि बलात्काराची बरीच प्रकरणे तुम्ही हाताळली आहेत. बलात्कारानंतर किती पीडित व्यक्तीनी आरोपीला 'आय लव्ह यू' म्हटलेय, हे तुम्हीच सांगा,' अशी विचारणा खंडपीठानं पीडितेच्या वकिलांना केली. 'पीडित महिलेवर जबरदस्ती केल्याचा कोणताही पुरावा दिसत नाही. दोघांची चर्चा आणि त्यांच्या ई-मेलवरून हे दोघेही चांगले मित्र होते, असं दिसत असल्याचं नमूद करीत खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews