• 3 years ago
उदयनराजेंना सांभाळा नाहीतर आम्ही बाहेर पडतो
रामराजेंचा पवारांना इशारा : जिल्ह्यात तीन पिसाळलेली कुत्री फिरत असल्याची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाºयांनी जावळी तालुक्यातील जमिनी कोणी लाटल्या? याचे उत्तर द्यावे, तुम्हाला मताधिक्क्य कमी भेटले म्हणून आमच्यावर राग काढू नका आणि अशा खासदार उदयनराजेंना पक्ष सांभाळणार असेल तर पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी खासदार शरद पवार यांनी आम्हाला द्यावी,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला.
नीरा-देवघरच्या पाण्यावरून खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते.
रामराजे म्हणाले, ‘पुनर्वसनाच्या जमिनींबाबत आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते आरोप उदयनराजेंनी सिद्ध करावेत. उदयनराजेंनी महसूल राज्यमंत्री असताना काय उद्योग केलेत, हे बाहेर काढणार आहे. माझ्यावर बोलणारे दोन खासदार आणि एक आमदार तिघेही यापूर्वी एकत्र होतेच, पूर्वी टेबलाखालून होते, आत्ता टेबलावर आले आहेत, मी त्यांना भीत नाही. असले बरेच आमदार-खासदार उरावर घेतले असून, दोन्ही खासदारांना मी काखेत घेऊन फिरणारा आहे. माझ्यावर पुनर्वसनाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करणाºया आ. गोरेंनी पनवेलजवळील जमिनीचे काय केले, हे पाहावे.’
दरम्यान, उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार हे तिघे पिसाळलेली कुत्री आहेत, अशी जहरी टीकाही रामराजेंनी यावेळी केली. नीरा उजवा कालव्यातून फलटण तालुक्यातील ३६, माळशिरस तालुक्यातील १७ आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावांना गेल्या १२ वर्षांपासून पाणी दिले जात होते. मात्र, शासनाने दि. १२ जून रोजी घेतलेल्या निर्णयामुळे आता या बागायती पट्ट्यातील गावांना मिळणारे नीरा-देवघरचे पाणी बंद होणार आहे, अशी चिंताही रामराजेंनी व्यक्त केली.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Category

🗞
News

Recommended