आकाशातही कोरोना ? Corona virus | Solar Eclipse | I ndia News

  • 3 years ago
काल भारतातल्या अनेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसलं. हे ग्रहण कंकणाकृती होतं. म्हणजेच एखाद्या बांगडीसारखं दिसलं. यालाच ईंग्लीशमध्ये कोरोना म्हणतात. सूर्य आणि पृथ्वीच्या मधे जर चंद्र आला तर सूर्यग्रहण पाहायला मिळतं. काल तिघंही काही काळासाठी एकाच रेषेत आले होते. म्हणून देशातल्या काही भागांत कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालं. गुजरातेतल्या भूज या शहरापासून हे ग्रहण दिसायला सुरूवात झाली. सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी भूजमध्ये सगळ्यात आधी हे ग्रहण पाहायला मिळालं. हे ग्रहण दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत चाललं. पृथ्वीवरून एका वर्षात किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहण दिसू शकतात. त्यामध्ये खग्रास ग्रहण एक किंवा दोनवेळा दिसतात आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाहीत. या वर्षी आता १४ डिसेंबर रोजी ग्रहण पाहायला मिळणार आहे. हे ग्रहण पूर्ण ग्रहण असेल. म्हणजेच सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येणार आहे. हा चंद्र सूर्याचा पूर्ण प्रकाश व्यापून टाकणार आहे. त्यावेळी पृथ्वीच्या काही भागावर अंधार पसरेल. पूर्ण ग्रहण पाहण्याची संधी अत्यंत दूर्मिळ मानली जाते. पण हे पूर्ण ग्रहण भारतात दिसणार नाही. दक्षिण अमेरिका, पॅसिफीक, अटलांटीक आणि हिंद महासागराच्या काही भागांत, अंटार्कटिका आणि आफ्रिकेत हे पूर्ण ग्रहण दिसणार आहे. गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळाले. भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून हे ग्रहण कंकणाकृती स्थितीत दिसले. महाराष्ट्रातून खंडग्रास ग्रहण दिसले. साधारण ७० टक्के सूर्य झाकला गेलेला पाहायला मिळेल.

#lokmat #grahan #india
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जे

Recommended