प्रियांका गांधी यांना घर सोडण्याचा आदेश देण्यात आला. प्रियांका गांधी वडेरा या लोक प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सवलतीच्या दरात देण्यात आलेला बंगला १ ऑगस्ट पर्यंत सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. याला उत्तर म्हणून प्रियांका गांधी यांनी बंगल्याचं ३ लाख ४६ हजार ६७७ रूपयांचं थकीत भाडंही भरून टाकलं आणि आता त्या लखनौला स्थलांतर करणार आहेत. ही थकीत रक्कम त्यांनी ३० तारखेला ऑनलाईन भरली आहे, असं गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयातल्या सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्सला दिली आहे. त्या या बंगल्याच्या भाड्यापोटी दरमहा ३७ हजार रूपये भरत होत्या. लखनौमध्ये त्यांनी एक बंगलाही पाहिल्याच्या बातम्या येताहेत. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. त्याची तयारी प्रियंका गांधी यांनी सुरू केली आहे. लखनौला प्रियंका गांधी शिफ्ट झाल्यानंतर तिथल्या काँग्रेसला बळ मिळेल असं बोललं जातंय. पण मुळात मोदी सरकारनी प्रियंका गंधींना लोधी ईस्टेटवरचा ३५ नंबरचा बंगला सोडण्याचा आदेश का दिला हे पाहू.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....