राज्यात 3 आठवड्याचा कडक लॉकडाऊन? CM Uddhav Thackeray | 3- Weeks Lockdown | Maharashtra News

  • 3 years ago
महाराष्ट्रात गेल्या नऊ दिवसात म्हणजे एप्रिल महिन्यात आतापर्यंत जवळपास ४ लाख ७५ हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. रुग्णवाढ आणि राज्यातील परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणावर ताण वाढतोय. औषधसाठा कमी पडतोय. लसीकरण मोहिमेवरही त्याचा परिणाम दिसून येतोय. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठीच सरकारने कठोर निर्बंध लागू केले होते. तरीही रुग्णसंख्या काही कमी झालेली नाही.. तर दुसरीकडे या निर्बंधावरून व्यापारी वर्गामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती, लसींचा साठा, निर्बंध शिथिल करायचे की आणखी कडक करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, तर सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणारच, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

#lokmat #Uddhavthackeray #Lockdown #Maharahtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat