दिव्यांगत्व आलंय म्हणून दुःख मानण्यापेक्षा त्याला ताकद बनवून परिस्थितीशी लढणारे वसंत पुजारी पुण्यातल्या वडारवाडीतील झोपडपट्टीत राहतात. २१ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात पुजारी यांना एक पाय गमवावा लागला. आधी ते वेल्डिंगचा व्यवसाय करायचे. पण अपघातातून बरे झाल्यानंतर त्यांनी मोजे, रुमाल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. घरी पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा चौथीत आणि मुलगी दहावीत आहे. सध्या बाणेर रस्त्यावर दिवसभर आपले तीनचाकी वाहन घेऊन त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क, टोपी, रुमाल, हेडफोन्स विकण्याचा व्यवसाय ते करत आहेत.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....