Waluj (Aurangabad) : निसर्गाची किमया! आळूच्या पानाला आले फुल, वाळूज परिसरात आश्चर्य

  • 3 years ago
Waluj (Aurangabad) : निसर्गाची किमया! आळूच्या पानाला आले फुल, वाळूज परिसरात आश्चर्य

Waluj (Aurangabad) : निसर्ग हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्यात फुलं आणि कळी आली. तर विचारायलाच नको. आपण आजपर्यंत अनेक रंगीबेरंगी फुले पाहिलेली आहेत. मात्र आळुच्या पानाचे फुल किंवा कळी कधी पाहिली का? नाही ना ? मात्र हा निसर्गाचा चमत्कार वाळूज येथे सोमवारी (ता.27) रोजी पाहावयास मिळाल्याने सर्वांना नवल वाटत आहे. ''आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे काही चालेना'' या म्हणीप्रमाणे निसर्ग कधी काय किमया करील. हे कोणीही सांगू शकत नाही. सटाणा (ता.वैजापुर) येथील राजू शिवलाल राजपूत हे कुटुंबासह वाळूज परिसरातील गणेश वसाहतीत राहतात. त्यांनी घराच्या परसबागेत अनेक लहान-मोठे झाडे लावलेली आहेत. त्यात आळुची पानेही लावलेली आहेत.

(व्हिडिओ - रामराव भराड)

#waluj #aurangabad

Recommended