एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध?; हात दाखवण्यासाठी थेट पाचोऱ्यात आल्याची चर्चा Eknath Shinde

  • 3 years ago
Eknath Shinde meet Astrologer राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी जळगावचा गोपनीय दौरा केला. मात्र शिंदेंचा हा पाचोरा दौरा चांगलाच चर्चेत आलाय. एका ज्योतिषाना हात दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे मुंबईहून पाचोऱ्याला आल्याची माहिती आहे. हा दौरा इतका गोपनीय होता की माध्यमं सोडा...शिवसैनिकांनाही या दौऱ्याची माहिती नव्हती. पाचोरा इथं आमदार किशोर पाटील आणि एक ते दोन विश्वासू जण एकनाथ शिंदेंसोबत पाचोरा दौऱ्यात होते, अशी माहिती मिळतेय. पाचोरा शहरातल्या कृष्णापुरी भागात गजानन नावाचे एक ज्योतिषी राहतात. त्यांना आपला हात दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे मुंबईहून आले असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाटेत कुठेही न थांबता ज्योतिषी गजानन यांच्या घरी दुपारी १२ वाजता एकनाथ शिंदे पोहचले. एका खाजगी खोलीत फक्त शिंदे आणि ज्योतिषी गजानन या दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. यानंतर शिंदे यांनी तात्काळ रस्त्याच्या मार्गानं पाचोऱ्याहून जळगाव गाठलं आणि तिथनं ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळतेय.
#Lokmat #Eknathshindes #astrologer #jalgaon #shivsena #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended