गाईच्या वासराला शेळीचा लळा; वासरासाठी शेळी झाली माय

  • 2 years ago
हिंगोलीत चक्क गायीच वासरू आणि शेळीमध्ये नात्यागोत्यांच्या पलिकडचा लळा पाहायला मिळतोयं. आपली आई गमावलेल्या त्या वासरासाठी शेळी अखेर माय झालीये. औंढा नागनाथ तालुक्यातल्या पिंपळदरी येथील धम्मादीप बबन भगत यांच्याकडे गुरं आणि शेळ्यासह पटावरील बैल आहेत. ते त्यांच्यावर खूप जीव ओतून सर्वांचं संगोपन करतात. त्यांनी पटावरच्या बैलांप्रमाणेच इतर प्राण्यांचीही माणसाप्रमाणं नाव ठेवली आहेत. त्यांच्याकडे असलेल्या राणी नावाच्या गाईसोबत मनी नावाची शेळी राहायची. दोघीही सोबत रहात असल्याने त्या एकत्र चरायच्या. एकेदिवशी राणी गाईचा अचानक मृत्यु झाला. राणीच्या मृत्यु नंतर भुकेने तिचं वासरू व्याकूळ झाल होतं. तेव्हा मनीच त्याच्यासाठी वासरची माय झाली. मनिनं त्याला स्वतःच दूध पाजून त्या वासराची भूक भागवली. आता राणीच्या वासराला शेळी मनीचा लळा लागलाय. मनिला देखील तीन पिल्लं झाली आहेत. मात्र तीने गाईच्या वासराला कधीच अंतर दिलं नाही.

Recommended