'कोयत्याच्या मुठीत'; स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतरही वेठबिगारी प्रश्न अनुत्तरीत

  • 2 years ago
बीड जिल्ह्यात उचल या नाटकाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. या नाटकातून एकंदरीत ऊसतोड कामगारांच्या जगण्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. रसिकांनी उचल या नाटकाला भरभरून दाद दिली. या नाटकाचे लेखक सुधीर निकम यांनी नाटकातून एक व्यापक विषय मांडला आहे. ऊसतोड कामगारांचा जगणं आणि मरणं हे सगळं ऊसाच्या फडातच होऊ लागलं. त्यांची मुले सहा महिने शाळेत तर सहा महिने पाचरटात राहू लागली. बीड जिल्हा सोडून इतर ठिकाणी ऊसतोडणीसाठी गेल्यावर त्यांच्या हालअपेष्टा त्यांच्यावर होणारा अन्याय हा वेळोवेळी राजकीय लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला आणि आजही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतर त्यांच्या भावना यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, हेच जळजळीत सत्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Category

🐳
Animals

Recommended