Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/26/2022
व्हिओ १: लग्नाच्या रेशमी गाठींचे क्षण स्मरणीय करण्याकरता लग्नात कोणतीही कमी केली जात नाही. तुम्ही हेलिकॉप्टर, बैलगाडी किंवा मोटरसायकलवर वराची वरात निघालेली बघितली असेल परंतु वधूची घोड्यावर बसलेली वरात पाहिलीये का? याचाच प्रत्यय आलाय बुलढाण्यातील खामगाव येथील समीक्षा सांगळे हिच्या वरातीमध्ये. आपल्याला मुलगा नाही याचा खेद न ठेवता सांगळे परिवाराने थेट मुलीची घोड्यावरुन वरात काढलीये. विजय सांगळे अन् त्यांच्या पत्नी पुष्पा सांगळे यांना दोन मुली आहेत. दोन्ही मुली असल्याची त्यांना कधीच खंत वाटली नाही. मुलांप्रमाणेच मुलींवर संस्कार करून त्यांनी मुलींना शिक्षण दिलं. त्यामुळे साहजीकच आपल्या मुलीची वरात घोड्यावरुन निघावी असं स्वप्न समीक्षाच्या आई वडिलांनी जीवनभर बाळगलं. हीच इच्छा त्यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळीला बोलून दाखवलीये. समीक्षाने परिचारीकेचे शिक्षण पूर्ण केलयं. तिचा विवाह सोहळा 26 मार्चला पार पडणार आहे. त्यापूर्वी 24 मार्चला समिक्षाची वरात बॅंडबाजा आणि डीजेच्या तालावर रमाजी नगर भागातून दणक्यात निघाली. या वरातीत ९० महिलांची उपस्थिती होती. महिलांनी सुद्धा फेटे घालुन आनंद लुटला. वराच्या लग्नात मित्र डिजेवर थिरकतात त्याच प्रमाणे समिक्षाच्या वरातीत महिला थिकरल्या. घोड्यावरून वरात निघावा अशी इच्छा आई-वडिलाची असल्याची प्रतिक्रिया यावेळी समीक्षाने दिली. समीक्षाच्या लग्नाची ही संकल्पना आणि निर्णय सर्वांनाच कौतुकास्पद वाटला. त्यांनी देखील या परिवाराचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन देऊन वरातीचा आनंद लुटला. आज मुला-मुलींमध्ये भेद नाही. मुलगा मुलगी एक समान असे अनेक जनप्रबोधन केले जातात. पण कृतीतून आदर्श हा सांगळे परिवाराने ठेवलाय. तो निश्चितच कौतुकास्पद आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Category

🗞
News

Recommended