महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान मास्कचा वापर करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. मास्क घालावं, मात्र ऐच्छिक असणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
Category
🗞
News