महाराष्ट्र शासनाच्या शाळा पूर्वतयारी अभियानला मुलुंड मधील वीणा नगर येथील मुंबई महानगरपालिका शाळेतून सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे विद्यार्थीना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे यावर्षी पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सामाजिक क्षमता, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता याची पाहणी या अभियाना अंतर्गत करण्यात आली. या अभियानाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी...
Category
🗞
News