• 3 years ago
अजित पवार... त्यांनी एखाद्याची जीरवायची ठरवली की ते काय करतात ते उभ्या महाराष्ट्राने अनेकदा पाहिलंय. हेच अजित पवार नियम पाळण्याच्या बाबतीतही किती कडक आहेत, ते सरकारी अधिकाऱ्यांना विचारा.. नियम कसा पाळायचा ते अजित पवारांनी करोना काळात गेल्या दोन वर्षात दाखवून दिलं.. ज्या मास्कला भलेभले कंटाळले, त्या मास्कचा नाद अजित दादांनी कधीच सोडला नाही. मार्च २०२० मध्ये करोना आला आणि मास्कची सवय लावता लावता वर्ष निघून गेलं. पण अजित पवारांनी जे मास्क लावलं, ते अखेर काढलंच नाही. शेवटी आरोग्यमंत्र्यांनीच मास्क अनिवार्य नसल्याची घोषणा केली. अजित पवार एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात असो, की मंत्रालयात, त्यांच्या चेहऱ्यावरचं मास्क कधीच उतरलं नाही.

Category

🗞
News

Recommended