• 2 years ago
मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई अशा देशातल्या महत्त्वाच्या दहा शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग चार क्रमांक चार आता कात टाकतोय. पुण्याहून निघालेला प्रवासी साताऱ्याला कधी पोहोचतो तेही कळत नाही. हा महामार्ग कधीकाळी खड्ड्यांचा मार्ग आणि मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जायचा. गेले कित्येक वर्ष हा महामार्ग अशाच अवस्थेत होता. रस्ता चांगला व्हावा यासाठी साताऱ्यातील तरुणांनीअनेक आंदोलनेही केली. पण पदरी नेहमी निराशाच पडायची.. मात्र रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यात स्वत: लक्ष घातलं आणि रस्त्याचं रुपडंच पालटलं.

Category

🗞
News

Recommended