औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील कायगावात फौजी सूनबाईचे सासूबाई आणि गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं .सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या सुनेचे सासूने औक्षण केलं. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील कायगावची सून असलेल्या पूजा खरात हिचे सीमा सुरक्षा दलात म्हणजे बी एस एफ पदी निवड झाली. पंजाबच्या होशियारपुरमध्ये सुमारे वर्षभर प्रशिक्षण करून पूजा ज्या वेळी गावात आली त्यावेळी गावच्या सुनेचे सासरच्या मंडळीकडून आणि गावकऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली . अशाच प्रकारे देशसेवेसाठी पुढे येणाऱ्या महिलांचे स्वागत झाले तर निश्चित सैन्यदलात महिलांचे प्रमाण आणि आत्मविश्वासही वाढेल...
Category
🗞
News