• 3 years ago
हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील आजीगावचे रहिवासी. गोरे काकांनी वयाची सत्तरी पार केलीयं. आयुष्यातली वयाची ४० वर्ष त्यांनी घोडेस्वारी केलीयं. ते दररोज ४० ते ५० किलोमीटर हून अधिक प्रवास हा घोड्यावरुन करतात. अपघाताच्या भीतीपोटी त्यांनी उत्तम आणि हटके पर्याय शोधलाय.

मर्सिडीजपेक्षाही देखण्या आणि तरणीबाण राणी घोडीच्या ताफांचा आवाज लोकांच्या कानी पडताच आजोबांना बघण्यासाठी गर्दी होते. भिकाजी आजोबांना पाहुण्याकडे जाणं असो किंवा बाजारात जाणं असो ते घोड्यावरुन प्रवास करतात. बिडी काडी, किराणा, लहान मुलांना दुकानावरुन खाऊ आणायचं म्हटलं तरी आजोबा घोड्यावरुन प्रवास करतात.

Category

🗞
News

Recommended