Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2022
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी संप मिटण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण, मुंबई उच्च न्यायालयाने आता कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेत. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देणे, ग्रॅच्युइटी, पीएफ-पेन्शन वेळेत मिळणे इत्यादीविषयी आम्ही आदेश देऊ, असं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी हायकोर्टाने २२ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिलीय. तोपर्यंत जे कामावर रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा एसटी महामंडळ आणि राज्य सरकारचा मार्ग मोकळा असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे संप मिटवून कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर व्हावं लागणार आहे. कोर्टाच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते काय म्हणालेत ते पाहू..

Category

🗞
News

Recommended