गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचं का?, Raigad मधील 'या' गावात भीषण पाणीटंचाई

  • 2 years ago
घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती. दूषित, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात. एका बाजूला महागाईच्या आगडोंबानं सर्वसामान्यांचे जगनं मुश्किल झालं असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाटं विभागात भीषण पाणी टंचाईनं डोके वर काढले आहे. मात्र पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील अनेक गावे वाड्या वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. ईथ जनतेला पाणी विकत घेण्याची नामुश्कि ओढवलीय. तसेच घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरु असून दूषित गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Recommended