महिला व बाल विकास विभागाकडून कंत्राटदाराच्या मार्फत जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, बुलढाणाच्या मोताळा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा तांडा (दाभा) येथे गेल्या १५ दिवसांपासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा बंद असल्याने शाळेमध्ये खिचडी शिजलीच नाही. खिचडी कधी मिळणार, असा प्रश्न सध्या विद्यार्थी आणि शिक्षक विचारत आहेत.
#Khichdi #MidDayMeal #Buldhana #Child #HWNews #GovernmentSchemes #Meal #ChildDevelopment #Poshan #Aahar #Motala #School #Teachers
#Khichdi #MidDayMeal #Buldhana #Child #HWNews #GovernmentSchemes #Meal #ChildDevelopment #Poshan #Aahar #Motala #School #Teachers
Category
🗞
News