मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलंय. मुळात दोघांमधील चर्चा ही गुलदस्त्यात आहे. मुळात मराठा आरक्षण द्यायचं असेल तर कायद्यात दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा हा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलीय.
Category
🗞
News