• last year
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव असून मोठ्या उत्साहाने नागरिक दिवाळी साजरी करत आहे.पुणे शहरात रस्त्यांवर फुगे तसेच इतर वस्तू विकणाऱ्या वंचित व गरजू मुला मुलींना दिवाळीचा आनंद घेता यावी यासाठी गेल्या 17 वर्षापासून आबा बागुल मित्र परिवाराकडून उपक्रम राबविण्यात आला. पुण्यातील सारसबाग येथे दिवाळी फराळ, नवीन कपडे व फटाके देऊन या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाटावर बसवून, अवतीभवती सुंदर रांगोळी काढून, सुगंधी उटणे, मोती साबण व गरम पाण्याने अभ्यंगस्नान घालून दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended