जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहराजवळ गॅस टँकर उलटून त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली. त्यामुळे आजूबाजूच्या कॉलन्यांमधील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर पारोळा महामार्गावर घडली. गॅस गळती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल व जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
Category
🗞
News