ठाणे : काश्मीर मधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृत पर्यटकांमध्ये डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा समावेश होता. संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने या तिघांवर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे यांच्यासह हजारो डोंबिवलीकर उपस्थित होते. डोंबिवलीतील तीन पर्यटकांच्या मृत्यूची बातमी समजताच डोंबिवलीकरांमध्ये संतापची लाट उसळली. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळपासूनच या बंदला प्रतिसाद मिळाला. या बंदला शिवसेना, भाजपा मनसे, शिवसेना ठाकरे पक्षासह अनेक सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला. तर, व्यापारी, शाळा आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले.
Category
🗞
NewsTranscript
00:00Oh