• 7 years ago
चाकण | मराठा मोर्चा हिंसक होताच विश्वास नागरे पाटील आले! आणि एकदम काय झालं बघा! Nangre Patil Pune

चाकणमध्ये मराठा मोर्चा हिंसक होताच विश्वास नागरे पाटील आले! आणि एकदम काय झालं बघा! Nangre Patil Pune चाकण : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनात काल पुणे जिल्ह्याच्या चाकण-राजगुरुनगर परिसरात मोठा हिंसाचार झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ. विश्वास नांगरे-पाटील यांनी येथील तरुणांना भावनिक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले. पुणे-नाशिक महामार्गावर काल दिवसभर आंदोलना दरम्यान दगडफेक, जाळपोळ असे प्रकार घडले. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. डाॅ. नांगरे-पाटील यांनी कालच घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आज येथे जमलेल्या तरुणांच्या जमावात जाऊन नांगरे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले. "मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे कारण माझ्या धमन्यांमध्ये छत्रपतींचे रक्त आहे,'' असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, "मी आपला मोठा भाऊ म्हणून सांगतो की हा परिसर औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला आहे. आपल्याला हाता तोंडचा घास हिंसाचार करुन जाऊ द्यायचा नाहीये. आपल्याला पुढच्या काळात खूप काही चांगले मिळणार आहे, हे मी जबाबदारीने सांगतो. मोठा भाऊ म्हणूनच मी आपल्याला शांततेचं आवाहन करतो." हे सुरु असतानाच आसपासचे तरुण मोबाईलवर नांगरे पाटील यांचे भाषण रेकाॅर्ड करत होते. हे लक्षात आल्यावर नांगरे पाटील यांनी रेकाॅर्डिंग न करण्याचे आवाहन तरुणांना केले

Category

🗞
News

Recommended