Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
मुंबई - महापालिकांच्या निवडणुकींचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. त्यात मराठी सेलिब्रेटीजचा सहभाग मोठा आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्लॅप युवर वोट हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुंबईतल्या दैनंदिन आयुष्यात माणूस अनेक समस्यांना तोंड देत असतो. या समस्यांशी दोन हात करताना महापालिकेच्या नावाने नेहमीच बोट मोडत असतो. मात्र, आपण मतदान न केल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा विसर त्याला पडतो. मतदानाबाबतची ही उदासीनता देर करण्यासाठी स्लॅप युवर वोट हा उपक्रम घेण्यात आला होता.

Category

🗞
News

Recommended