मालेगाव नेमके आहे तरी काय | महाराष्ट्र पोलीस | Sakal Media | Sakal

  • 3 years ago
मालेगावातील कोरोनामुळे निर्माण झालेली एकूण परिस्थिती व आढावा...महाराष्ट्र पोलीसांकडून व्हिडिओ

मालेगाव : आधीच मंदीमुळे संकटात सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला कोरोनाने अगदी संपवलंच होतं. त्यामुळे यावर काम करुन उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणाऱ्या सुमारे 2 ते 3 लाख मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि मजुरांची होणारी उपासमार हे लक्षात घेता शहरातील अर्थकारणाचा प्रमुख घटक असलेला यंत्रमाग उद्योग अखेर (ता.६) कंटेनमेंट झोनबाहेर सुरु करण्यात आला. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व निर्बंध कायम आहेत. यासाठी सरकारने अटी आणि शर्ती देखील लागू केल्या. मालेगावातील हाच यंत्रमाग उद्योग सुरू होऊन आठवडा पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मालेगावातील एकूण परिस्थिती, यंदाची ईद आणि पोलीस व प्रशासनाने घेतलेली मेहनत याचा आढावा घेणारा एक व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रसारित करण्यात आला आहे..काय आहे ते पाहुयात...

#Nashik #Malegaon #Maharashtra #Trending