पारंपरिक व आधुनिक व्यायामप्रकार;मुदगल/मोगरी फिरवणे | Pune | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
भारतीय मल्लविद्येच्या जडणघडणीत अनेक पारंपारिक व्यायामप्रकार सांगितले आहे.आजच्या अत्याधुनिक व्यायामशाळेची पाळेमुळे ही मल्लविद्येच्या व्यायामशास्त्रात फारपूर्वीपासून प्रचलित आहेत.भारतीय व्यायामशास्त्र हे केवळ अंगमेहनतीवर अवलंबून आहे.या व्यायामासाठी आपल्याला एकही रुपया खर्चावा लागत नाही.जिथे असाल तिथून सुरवात करू शकणारा व्यायामप्रकार म्हणजे भारतीय व्यायामशास्त्र.त्यातील बाह्य वस्तूंचा वापर करून स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी जे व्यायाम अस्तित्वात आले त्यातील मुदगड/मोगरी फिरवणे हा एक व्यायामप्रकार होय.मुदगल अथवा मोगरी किंवा काही ठिकाणी गदा फिरवणे असेही याचे उच्चार पहायला मिळतात.मोगरी अथवा मुदगल ही मुळात युद्धशास्त्रातील शस्त्र होय.फार दूरवर न जाता शिवकालीन युद्धशास्त्रात जो गुर्ज वापरला जात असे तो गुर्ज म्हणजे मोगरीचे रुप होय.फरक इतकाच की गुर्ज पोलादी असून त्याच्या पुढे पोलादी व धारदार पाकळ्या असतात. समोरासमोर केल्या जाणाऱ्या हातघाईच्या युद्धात प्रतिपक्षाच्या पायदळाच्या डोक्यावर असणारे शिरस्त्राण अर्थात हेल्मेट फोडणे हा या शस्त्राचा प्रमुख उपयोग होय.शिवकाळात गावोगावी असणाऱ्या तालमी म्हणजे जणू युद्ध प्रशिक्षण केंद्रे असायची.यात जवान कुस्ती व इतर युद्धाला पूरक व्यायामप्रकार करायचे व त्यातील लाकडी मोगरी फिरवून गुर्जाचा अभ्यास करायचे.कालांतराने 1857 च्या व्यापक उठावानंतर ब्रिटिशांनी तालमीत असणारी हत्यारे नामशेष केली.(Video Pramod Shelar)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended