पुणे - दूरचित्रवाहिन्या आणि इंटरनेटच्या युगात शालेय विद्यार्थ्यांचे मैदानी क्रीडा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असताना आता वेगवेगळी कलाकौशल्ये शिकण्याकडेही ते पाठ फिरवत आहेत. दशकभरापूर्वी उन्हाळ्याच्या सुटीत "जादू' शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा होता. मात्र, हे चित्र बदलले असून, विद्यार्थ्यांऐवजी तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा ही कला शिकण्याकडे अधिक ओढा आहे. प्रसिद्ध जादूगार संजय रघुवीर यांच्याशी साधलेल्या संवादातून या नव्या प्रवाहाबाबत माहिती मिळाली.
Category
🗞
News