Winter Assembly Session: 'मेरीटची मुलं राहिली बाजूला अन्...'; TET प्रकरणावरून Ajit Pawar आक्रमक

  • 2 years ago
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. टीईटी घोटाळा प्रकरणावरून आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. शिक्षक भरती परीक्षा घोटाळा प्रकरणावर चर्चा करण्याबाबत सभागृहात विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं कारण देत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा करू नये, असं आपल्या उत्तरात सांगितलं. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आपली परखड भूमिका मांडली

.

Recommended